१५ वर्षे पगार नाही, स्वातंत्र्यदिनी शिक्षकाची आत्महत्या

0

गोंदिया: तब्बल १५ वर्षे प्रामाणिकपणे काम करूनही पगार न मिळाल्याने गोंदिया जिल्ह्यातील विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळेतील एक शिक्षकाने स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. केशव गोबाडे असे मृत शिक्षकाचे नाव आहे. गरिबी, नैराश्य व सहनशीलता संपल्यानेच गोबाडेंनी हे टोकाचे पाऊल उचलले.

गोबाडे हे आदिवासी ज्युनियर कॉलेज, झाशीनगर, मोरगाव अर्जुनी येथे विनावेतन कार्यरत होते. शासनाची वेतन अनुदान दिरंगाई व हलगर्जीपणामुळे ते नैराश्येत होते. वेतन नसल्याने मागील ६ वर्षांपासून त्यांची पत्नी मुलासह त्यांना सोडून गेली होती. लहानपणीच आईचे निधन झालेले होते. फक्त वडील होते आणि त्यात १ रुपया वेतन नाही. अनुदान येईल या आशेवर ते जगत होते. पण आचारसंहिता जवळ येऊन ठेपलेली असतानाही शासन निर्णय निघत नव्हता. या सर्व तणावाखाली त्यांनी गुरुवारी विष प्राशन करून स्वत:ला संपवले. त्यांच्या आत्महत्येनंतर गोंदिया जिल्ह्यातील विनाअनुदानित शिकक्षांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.