स्वच्छ भारत अभियानात पाचोरा नगरपरिषद राज्यातून ८३ व्या स्थानी

0

पाचोरा :- स्वच्ध भारत अभियान सन २०१८-१९ या मिनिस्ट्री आॅफ हाऊसिंग अंतर्गत अफेयर या केंद्र शासनाकडून देशाच्या पश्र्चिम भागातील २० झोन मधुन १ हजार २ नगर परिषदांची निवड करण्यात आली. त्यात पाचोरा नगरपरिषदेचा राज्यातुन ८३ वा क्रमांक आला आहे. यासाठी पाचोरा नगर परिषदेने १०० टक्के शहर हागणदारीमुक्त करुन २२ सार्वजनिक शौचालय बांधून त्याचा १०० टक्के वापर करण्याची सवय नागरिकांना लावली. याशिवाय दिलेल्या उद्दिष्टांपैकी १ हजार ७०० शौचालयापैकी १ हजार ३८० शौचालय पुर्ण करुन त्याचा वापर ही सुरू झाला आहे. कचरा संकलानात पालिकेने ५५ घंटा गाड्या खरेदी करून प्रत्यक्ष घरोघरी जाऊन ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याची सवय लावुन घन कचरा व्यवस्थापना अंतर्गत खत निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पाचोरा नगर परिषदेला सन – २०१६-१७ या वर्षी स्वच्छ महाराष्ट्र हगणदारीमुक्त योजनेअंतर्गत १ कोटीचे बक्षिस व प्रशस्तीपत्र प्राप्त झाले होते. यापैकी पालिकेस शासनाकडुन ४५ लाख रुपये अनुदान ही प्राप्त झाले आहे.

पाचोरा नगरपरिषदेची निवडणूक झाल्यानंतर पालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर स्वच्छतेचा विषय असो अथवा पाणी टंचाईचा विषय असो यासाठी शिवसेनेना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व जनाधार विकास आघाडी असो यावेळी चांगल्या कामांसाठी सर्वच नगरसेवक पुढे येवुन सहकार्य करतात. आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, तात्कालिन मुख्याधिकारी किरण देशमुख, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, उपमुख्याधिकारी राजेंद्र पाटील, आरोग्य सभापती सतिष चेडे, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, योजनेचे काॅडनेटर मयुर खंडवाले, मुकादम देविदास बेहरे, सुनिल चव्हाण, अरुण गायकवाड, बापु ब्राम्हणे, समाज सेवक मुकुंद बिल्दिकर सह सर्व नगरसेवक व आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छ भारत अभियानात वाहुन घेतल्यानंतर १०० टक्के हागणदारीचा विषय असो वा शहरातील स्वच्छतेचा विषय असो यासाठी मेहनत घेऊन स्वच्छतेबाबत प्रखरपणे प्रचार व प्रसार केला. व यापुढे पाचोरा शहर स्वच्छ भारत अभियानात पश्र्चिम झोन मधुन प्रथम क्रमांवर येण्याकरिता मेहनत घेत आहेत. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करून स्वच्छतेबाबत मार्गदर्शनासाठी किंवा कामे करून घेण्यासाठी पालिकेने सुरू केलेल्या “स्वच्छता अॅप” वर संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी सोमनाथ आढाव व आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.