साकळीत महिलेची छेड काढल्यावरून एकास मारहाण : पोलीसांनी केला दंगलीचा गुन्हा दाखल

0

यावल (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकळी या गावात एका महीलेची छेड काढल्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका गटाने तरुणास मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत आरोपी आणी फिर्यादी यांनी परस्पर एकामेकांविरूद यावल पोलीसात फिर्याद दाखल केली असुन घटनेमुळे गावात तणावपुर्ण शांतता निर्माण झाली आहे.. या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील साकळी या गावातील भोईवाडयात राहणारा गौरव पुरूषोत्तम माळी वय२५ वर्ष यांने याच परिसरात राहणाऱ्या एक महीला ही सायंकाळी १९ वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर धोतलेल्या तांदुळाचे पाणी फेकण्यास गेली असता या आरोपी गौरव माळी यांने महिलेचे हात पकडुन तिला तज्जा वाटेल असे कृत्त केले व कुणास सांगीतल्यास तुला जिवे ठार मारेन अशी धमकी दिली या कारणा वरून महीलेने यावल पोलीसात फिर्याद दाखल केली असुन , दुसऱ्या एका फिर्यादीत गौरव पुरूषोत्तम माळी यांने दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की गावातील राहणारे सद्दाम रसुल पिंजारी , बाबा शाहरूख रा. ग्रामपंचायत जवळ साकळी , तौसीफ गुलाम शेख , रा . अक्सानगर साकळी , अल्लाउद्दीन शेख रा . भोईवाडा , साकळी , आदील गॅरेजवाला वअल्तमश ईकबाल शेख रा. भोईवाडा साकळी यांनी बेकाद्याशीर मंडळी जमवुन संगनमताने फिर्यादीच्या घराचा दरवाजा तोडुन त्यास बेदम मारहाण केली अशी फिर्याद दाखल दिली असुन , पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी या घटनेचा तपास करीत असुन , दरम्यान घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे , विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांनी आज तात्काळ घटनास्थळी भेट देवुन परिस्थितीचा आढावा घेतला व गावातील सर्वधर्मीय समाज बांधवांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक साकळी ग्रामपंचायत कार्यालयात घेतली व नागरीकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता गावातील शांतता व एकात्मता कायम राखावी असे आवाहन करून , अशा प्रकारे कृत करणाऱ्या व्यक्तिस मग तो कुणीही असो त्यास सोडले जाणार नाही असेही त्यांनी सांगीतले . शांतता समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रवीन्द्र सुर्यभान पाटील व आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते .

Leave A Reply

Your email address will not be published.