”सबका साथ सबका विकास”जोड लाभल्याने खा.रक्षा खडसे लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार- आ. खडसे

0

भुसावळ :- देशाच्या चौफेर विकासाच्या जोरावर आणि रावेर लोकसाभ मतदार संघात केलेल्या सरकारच्या विविध योजना राबविण्यामध्ये अग्रेसर ठरलेल्या खा. रक्षा खडसे मागच्या निवडणूकीत भुसावळ मधून ५५ हजारांच्या फरकाने निवडून आल्या होत्या. आता तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सबका साथ सबका विकास याची जोड लाभल्याने त्या लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्‍वास माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केला.
ते दि. २४ मार्च रोजी भुसावळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित पेजप्रमुखांच्या संमेलनात अध्यक्षिय भाषणात बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर खा. रक्षा खडसे, आ. संजय सावकारे, बेटी बचाओ बेटी बढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, जि.प. माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे, सभापती प्रीती पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक युवराज लोणारी, मुकेश पाटील, नगरसेविका प्रितमा महाजन, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, पं.स सदस्या मनीषा पाटील,गटनेता मुन्ना तेली, नगरसेवक प्रमोद नेमाडे, जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, उद्योगपती मनोज बियाणी, रावेर लोकसभा मतदार संघाचे विस्तारक हर्षल पाटील, वरणगावच्या नगरसेविका अरुणा इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, जागृती बढे, देवा वाणी, नारायण कोळी आदी उपस्थित होते.

आ. खडसे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीत रोज नवीन नवीन चेहर्‍यांची इनकमिंग सुर आहे. कॉंग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नातू प्रतिक पाटील यांनी पक्षात प्रवेश केला. गेली अनेक वर्ष देशाच्या सत्तास्थानी असलेले आज पक्ष का सोडत आहेत? त्यांना, या देशाचे नेतृत्त सक्षम व्यक्तीच्या हातात असल्याचा विश्‍वास आहे. देश सक्षम ठेवायचा असेल तर मोदीं शिवाय या देशाला पर्याय नाही. सर्वसामान्यांपासून विरोधकाना हे पटले असल्यामुळे भाजपात इनकमींग सुरच आहे. सबका साथ सबका विकासाचा नारा देत विविध विकासाच्या योजना घरा घरापर्यंत पोहचविल्या. देशात जावे तिकडे रस्त्यांचे जाळे विणतांना दिसत आहे. मागच्या पेक्षा अधिक्ष संख्येने भाजपासह सहकारी पक्षांचे सदस्य बहुमताने निवडून येतील. मागील सरकारांनी दहशत वादाविरद्ध पाउले उचले नाहीत. मात्र नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले.

सीमा व देश सुरक्षित ठेवण्यासाठी भाजपाच्या खासदारांना निवडून द्यायाचे आहे. लाखाच्या मताधिक्याने निवडून येणे सहज शक्य नाही. विरोधक कोण? कसा आहे? समोरच्याला कधीही कमजोर समजू नये. मताधिक्य वाढविण्याची खरी जबाबदारी बुथ प्रमुखांची आहे. पेज प्रमुखांनी मतदानाच्या दिवसापर्यंत सातत्याने पाठपुरावा करण. मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी पेज प्रमुखांनी महिनाभर स्वस्त बसू नये.मेरा बुथ सबसे मजबूूत करायाचे आहे. मेहनत करा, मतदारांपर्यंत पोहचा त्यांना मतपेटीपर्यंत आणा. देशामध्ये रावेर लोकसाथा मतदार संघ पाचव्यास्थानी होता. येत्या निवडणूकीत प्रभम क्रमांकावर आणण्यासाठी बुथ प्रमुखांनी तयारी करा. जिद्दीने कामाला लागा.
आ. संजय सावकारे यांनी, या निवडणूकीत खा. रक्षा खडसे यांना भुसावळ मतदार संघात एक लाखाचा मताधिक्य मिळवून देवू असा ठाम विश्‍वास व्यक्त करत शक्ती केंद्र प्रमुखांनी बुथ प्रमुख आणि केंद्र प्रमुख यांना एकत्र आणण्याची जबाबदारी योग्य प्रमाणे पार पाडली आहे. यामुळे कार्यकर्ते कामाला लागले. कॉंग्रेसने आधिच माघर घेतली याचा अर्थ विरोधकांनाही खात्री आहे. येथे व केंद्रात भाजपचीच सत्ता येणार.

खा. रक्षा खडसे यांनी, मी समाधानी आहे. मतदारांच्या विश्‍वासावर मला पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील या करिता संघटना मजबुती करण चांगले झाले आहे.देशाचा व मोदींचे व नाथाभाऊंचे नेतृत्वा खाली देशात पुन्हा भाजपाचा झेंडा फडकवायचा आहे. यंदा महिलांचे मतदान पुरुषांपेक्षा जास्त होणार असा विश्‍वास व्यक्त केला. भुसावळ तालुका आयडल करण्याचा प्रयत्न असणार आहे. रेल्वेच्या माध्यामातून रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. विजय निश्‍चित आहे.मताधिक्यासाठी नाथाभाऊंच्या पाठीशी खंभीर पणे उभे राहण्यासाठी व वरिष्ठ नेत्यांना बळकटी देण्यासाठी जोमाने कामाला लागा.
राजेंद्र फडके यांनी, देश सुरक्षित ठेवण्यासाठी शासनकर्ते म्हणून मोदी सक्षम आहेत. यासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले आहे.
यावेळी, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक प्रा.डॉ. सुनील नेवे यांनी केले.
यावेळी भाजपात कृउबाचे माजी सभापती सोपान भारंबे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अनिल पाटील, सुनील पाटील, पिंपळगावचे माजी उपसरपंच प्रविण पाटील यांनी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.त्यांचे स्वागत आ. एकनाथराव खडसे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.