शेतकऱ्यांसाठी विजपुरवठा दिवसा करा ; भडगाव शेतकरी संघटनेचे निवेदन

0

भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यासाठी शेती विज पंपांसाठी शेतकर्यांसाठी विज पुरवठा दिवसा करावा. तसेच लोङशेङींग मुक्त विज पुरवठा करावा. या मागणीचे निवेदनाच्या प्रती भडगाव तालुका शेतकरी संघटनेमार्फत राज्याचे उर्जामंञी ना. नितीन राउत, भङगाव तहसिलदार माधुरी आंधळे, भङगाव विज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता अजय धामोरे आदिंना दिलेल्या आहेत.

राज्याचे उर्जामंञ्यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे कि, भङगाव तालुक्यात शेती विज पंपांना शेतीसाठी शेतकर्यांसाठी दिवसा विज पुरवठा करावा. लोङशेङींग मुक्त विज पुरवठा करावा. शेतकर्यांना राञी ऐवजी दिवसा विज पुरवठा मिळावा. जेणेकरुन दिवसा शेतामध्ये काम करुन थकलेला शेतकरी राञी आराम तरी करेन. शेतकर्यांना राञीचा विजपुरवठा दिलेला असल्याने शेतकरी दिवसभर शेतात काम करुन राञी पुन्हा पाणी भरण्यासाठी शेतात येतो. शेतकर्याच्या जीवाला आराम मिळत नाही. स्वास्थ धोक्यात आलेले आहे. असेही निवेदनात नमुद केलेले आहे. तसेच आम्हा शेतकर्यांना मिळणारा विज पुरवठा हा लोङशेङींग मूक्त करावा. शेतकर्यांसाठी लोङशेङींग करु नये. शेतकर्याला वेळेवर विज पुरवठा मिळाल्यास शेतकरी शेताला वेळेवर पाणी देईल. शेतकर्याला शेतापासुन हमीचे उत्पन्न मिळेल. त्यासाठी शेतकर्यांना मिळणारा विज पुरवठा हा लोङशेङींग मुक्त व दिवसा मिळणे आवश्यक आहे. शेतकर्याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात. या जगाच्या पोशिंदयाला वेळेवर विज मिळाली तर तो शेतातुन चांगल्या प्रकारे उत्पन्न घेउ शकतो.त्यामुळे शेतकर्याला कर्जमाफीची गरज भासणार नाही. खते, बियाणे, औषधी, रोटाव्हेटर, टीलर, कोळपणे, निंदणी, फवारणी याला येणार्या खर्चाच्या तीन पट हमी भाव शेतकर्याच्या यिकाला मिळाला. तर शेतकर्याला कर्ज माफीची गरज भासणार नाही.सरकारी कामे वेळेवर झाली पाहीजे. पिक विकण्यासाठी प्रत्येक तालुक्यात कमीत कमी दोन खरेदी, विक्री केंद्र पाहीजे. शेतकर्याने माल विकल्यानंतर दोन दिवसाचे आत त्याला पैसे मिळतील. अशी व्यवस्था शासनाने केली पाहीजे.तसेच अनियमित विज पुरवठयामुळे शेतकर्यांच्या इलेक्टीृक मोटारी जळुन शेतकर्यांचे नुकसान होते. तरी वरील सर्व विषयानुसार शासनाने निर्णय घ्यावा असेही शेवटी निवेदनात नमुद केले आहे. या निवेदनावर शेतकरी संघटनेचे भङगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, तालुका उपाध्यक्ष विलास देशमुख, शहराध्यक्ष भगवान चौधरी, मनोज परदेशी, तालुका सरचिटणीस जगन्नाथ मोरे, तालुका सल्लागार प्रताप पाटील, हरी वंजारी, सदस्य लक्ष्मण पाटील, प्रकाश राठोङ, अशोक पाटील, काशिनाथ नरवाङे, सुधाकर पाटील, कन्हैय्या महाजन, गोविंद नरवाङे,बाबुराव पाटील आदि पदाधिकार्यांच्या सहया आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.