शिवसेनेतर्फे ‘कोविड लसीकरण आपल्या दारी’ उपक्रम संपन्न

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना – युवासेना व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने व शिवसैनिक विराज कावडीया यांच्या पुढाकाराने कोविड लसीकरण आपल्या दारी हा उपक्रम सोमवार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी जळगाव शहरातील तुकारामवाडी – गणेशवाडी परिसरात आयोजित करण्यात आला होता. १८ वर्षा पुढील सर्व व्यक्तींसाठी कोविशिल्ड डोस, पात्र व्यक्तींसाठी दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.

शिबिराचे उदघाटन शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर नितीन लद्धा, उपमहापौर कुलभूषण पाटील, महिला महानगरप्रमुख  शोभा चौधरी, ज्योती शिवदे, मंगल बारी, युवासेना विस्तारक किशोर भोसले, विधानसभा क्षेत्र प्रमुख राधेशाम कोगटा, शिवसैनिक विराज कावडीया, युवासेनेचे महानगरप्रमुख विशाल वाणी, अंकित कासार, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, गणेश गायकवाड, नगरसेवक नितीन बर्डे, अनंत जोशी, प्रशांत नाईक, मनोज चौधरी, इबा पटेल, जब्बार शेख, विक्रांत तोरस्कर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रीतम शिंदे, उमाकांत जाधव, संदीप सूर्यवंशी, लखन मोरे, पवन चव्हाण, प्रपांच पाटील, अजय वंजारी, आर्यन सुरवाडे, अरुण गोसावी, अमीत जगताप, तुषार माळी, संदीप वाणी, देवा झाल्टे यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.