वरणगावला तीनदिवसीय फिरती व्याख्यानमालेचे आयोजन 

0

भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरणगाव येथे चंद्रशेखर झोपे व दीपक झोपे यांचे वडील स्व. भागवत झोपे यांच्या आठवणी जपण्यासाठी तीन दिवसीय फिरती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

सुसंस्कारित विचार प्रवाह पोहोचविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनःपटलावर चांगले विचार रुजवण्यासाठी अविरत सेवा देणारे स्व. भागवत  झोपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीनदिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे कार्य करणाऱ्या भागवत झोपे सरांच्या स्मृतीनिमित्त व्याख्यानमालेच्या माध्यमातून आपल्या परिसरातील लेखक व कवी यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्याचा उद्देश आहे.
या व्याख्यानमालेचा मुख्य विषय बाप असून तीन दिवसांमध्ये याविषयी विचारवंत  आपले विचार मांडणार आहेत. 20 डिसेंबरला व्याख्यानमाले ची सुरुवात करण्यात येणार आहे  तर 23 डिसेंबरला  या व्याख्यानमालेचा  समारोप महात्मा गांधी विद्यालयात होणार आहे   स्थानिक  वक्त्यांना  व्यासपीठ या माध्यमातून उपलब्ध होईल.  शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याचा छोटासा प्रयत्न आहे .

यात 20 डिसेंबरला दुपारी दोन वाजता पहिले पुष्प पिंपळगाव बुद्रुक येथील शास्त्री विद्यालयात जि प शाळा जोगलखोरी ता. भुसावळ येथील उपशिक्षक तथा ह भ प दीपक पाटील महाराज पहिले पुष्प गुंफणार असुन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव सरोदे आहेत यावेळी  संचालक मंडळ प्रमुख पाहुणे असतील तर कै. के एस ए गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज रावेर येथील प्राध्यापक पंकज पाटील दुसरे पुष्प पिंपळगाव खुर्द येथील हरी कीटकुल बढे येथे दुपारी दोन वाजता गुंफणार आहे या कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी  चंद्रकांत हरी बढे सर असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे . तृतीय पुष्प  महात्मा गांधी विद्यालयात सकाळी नऊ वाजेला सेन्ट आलायसेस मराठी प्राथ. शाळेतील  उपशिक्षक जीवन महाजन गुंफणार आहेत यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रकांत बढे  सर असतील तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष वंदना पाटील  व संचालक मंडळ उपस्थित राहिली.

ग्रामीण भागातील मुलांना होणार व्याख्यानाचा लाभ
विचारवंत लेखक कवी यांची व्याख्याने शहरातून नेहमी होत असतात यामुळे व्याख्यानांचे आकर्षण ग्रामीण भागात नाही यामुळे विद्यार्थी वाचनापासून दूर जात आहे ही गोडी वाढावी तसेच व्याख्यानांचे महत्त्व समजून घ्यावे व स्थानिक लेखक वक्ते यांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्दिष्टाने या व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली असून पालक विद्यार्थी शिक्षक शिक्षण प्रेमी यांनी या व्याख्यांमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन चंद्रशेखर झोपे व दिपक झोपे यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.