येत्या २० ला गुजराथी समाज महिला मंडळाच्या वतीने आनंद मेला चे आयोजन

0
महिलांनी बनविलेल्या विविध वस्तू आणि पदार्थांचे असणार स्टॉल.*
जळगाव – महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने येत्या 20जानेवारी ला रविवारी येथील रिंग रोड समोरील सत्यवल्लभ हॉल मध्ये गुजराथी समाज महिला मंडळाच्या वतीने सकाळी 10ते रात्री 10पर्यंत आनंद मेला चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्षा भावना चौहाण यांनी दिली.
    हा आनंद मेला म्हणजे गुजराथी समाज महिला मंडळाचा पहिलाच उपक्रम आहे.नुकतीच प्रथम कार्यकारिणी जाहीर झाली आणि महिलांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा आणि स्वयंरोजगार साठी त्यांना घरगुती बनविलेल्या वस्तू विक्री साठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.विशेष म्हणजे यात महिलांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.विशेष म्हणजे या आनंद मेळ्यात सेल्फी पॉइंट देखील असणार आहे.जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना यात आनंद लुटता येईल.
     रविवारी हा कार्यक्रम असल्याने सुट्टीचा दिवस असून, जास्तीत जास्त नागरिकांनी यात आपल्या परिवारासह सहभाग नोंदवून यात सहभागी महिलांना प्रोत्साहन द्यावे.असे आवाहन गुजराथी समाज महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.