मोठी बातमी : देशात ‘या’ तारखेपासून सुरु होणार कोरोना लसीकरण

0

मुंबई : कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल.

यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सीरमनं उत्पादीत केलेल्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्स या दोन लसींचं लसीकरण करण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 16 जानेवारीपासून कोरोनाची ही लस सर्वसामान्यांना दिली जाईल. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वर्षभराच्या आतच भारताना कोरोना प्रतिबंधक लस विकसित केली आहे. कोरोनाची ही लस सर्वात आधी डॉक्टर, नर्स यासारखे आरोग्य कर्मचारी, सैनिक यासारख्या कोरोना योद्धांना दिली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.