मुख्यमंत्री ठाकरेंच्या निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा शिरकाव

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानी लागोपाठ दुसऱ्या दिवशी आणखी एका शासकीय कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधीर नाईक यांचा कोविड चाचणी अहवाल कोविड पाँझिटीव्ह आला होता. त्यानंतर आता आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्याच वर्षा निवास्थानी कोरोनाचा शिरकाव झाल्याने चिंतेचे वातावरण निर्णाण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी OSD सुधीर नाईक यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना वोक्हार्ट हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व अधिकरी आणि कर्मचाऱ्यांची कोविड 19 चाचणी करण्यात येतेय. त्याच वेळी आता आणखी एक कर्मचारी कोरोना  चाचणीत पाँझिटिव्ह आल्यामुळे मुंबई महापालिकेने आता अधिक सतर्क होत सॅनिटायजेशन सुरू केलंय. वर्षा निवास्थान परिसरातील सर्व शासकीय आणि खासगी निवास्थानी रहात असलेल्या नागरिकांचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत की नाही याची सखोल तपासणी आता बीएमसीने सुरू केलीय.

तसेच गरज भासल्यास आजारी आणि संशयित व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येतेय. याआधीही मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना सुद्धा 20 तारखेला कोरोनाची लागण झाली होती.

त्यानंतर रश्मी यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. उपचारानंतर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी कोरोनावर मात केली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने सर्व सेवा, सुविधा सुरू करण्यात येत आहेत. मात्र, आता त्याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शासकीय निवास्थानी कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.