मालगाडीचा धक्का लागल्यामुळे चाबीमनचा मृत्यू

0

भुसावळ :  मालगाडीचा धक्का लागल्यामुळे चाबीमनचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हि घटना आज  सकाळी १२ वाजेच्या दरम्यान  झेड.टी.सी.कॉर्डलाईनजवळ घडली. धुन्नी बद्रीला (चाबीमन) असे या कर्मचार्याचे नाव आहे.

धुन्नी बद्रीला (चाबीमन) हे नेहमीप्रमाणे सकाळी झेड.टी.सी.गेट क्रमांक एक जवळील कॉर्ड लाईनवर आपली ड्युटी करीत होत. त्याचवेळेस मालगाडीचा धक्का लागल्याने सकाळी ११:५५ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.  दरम्यान शव १:३० वाजेपर्यंत तापलेल्या उन्हात पडून असल्याने प्रशासनाला माहिती देऊनही घटनास्थळी लोहमार्ग पोलीस कर्मचारी न आल्यामुळे प्रशासनाची कर्मचाऱ्यांबद्दलची बेपर्वाई दिसून आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.