पाचोरा येथे “महिला सुरक्षा व सायबर कायदे” विषयावर कार्यशाळेचे आयोजन

0

पाचोरा – जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव व एस. एस. एम. एम साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ९:३० वाजता “महिला सुरक्षा व सायबर कायदे” या विषयावर माध्यम प्रतिनिधींसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेचे उद्घाटन एस. एस. एम. एम साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाचोरा विभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे हे असणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून पाचोरा उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  ईश्वर कातकाडे हे उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यशाळेस माध्यम प्रतिनिधी, नागरिक, महिला व विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.