भुसावळात पाच अनधिकृत गाळ्यांना पालिकेने ठोकले सील

0

भुसावळ (प्रतिनिधी) :  राजकीय वजनाचा वापर करून शहरात पालिका मालमत्तांवर अनधिकृत बांधकाम करून लाखो रुपयांमध्ये गाळे विक्रीचा ट्रेंड शहरात रूजला होता मात्र नूतन मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी नगरपालिका मालमत्तांवर अतिक्रमण केलेल्या गाळ्यांचे आधी बांधकाम तोडून सत्तेचा दुरूपयोग खपवून न घेण्याचा इशारा दिला असताना मंगळवारी पुन्हा मुख्य बाजारपेठेतील डेली भाजीबाजारातील सर्वे क्रमांक 150 मधील पालिकेच्या मालकी हक्क असलेल्या जागेवरील पाच गाळ्यांना पालिका पथकाने मंगळवारी सील ठोकल्याने खळबळ उडाली.

संबंधित गाळेधारकांना सात दिवसांच्या आत मालकी हक्क सिध्द करावा अन्यथा गाळे पाडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

नगरसेवक असल्याने अतिक्रमणासह बेकायदा बांधकामचा ट्रेंड काही लोकप्रतिनिधींनी शहरात रूजवला होता शिवाय लाखों रुपयांमध्ये गाळे विक्रीचा फंडादेखील सुरू होता मात्र मुख्याधिकार्‍यांनी नगरसेवकांच्या मनसुब्यांवर पाणी उधळूत कर्तव्यदक्षतेचा परीचय दिला आहे. पालिकेने यापूर्वी शहरातील मरीमाता मंदिराजवळील पालिका जागेवरील बांधकाम तोडले तर यानंतर खडका रोडवरील नॅशनल शाळेच्या बाजूला असलेल्या आठ गाळ्यांना सील ठोकल्यानंतर एका नगरसेविका पतीचा थेट संबधीत असलेल्या मुख्य बाजारपेठेतील दैनंदिन भाजीबाजारातील सार्वजनिक शौचालयाच्या कडेला असलेल्या जागेवरील पाच गाळ्यांना सील ठोकल. ही पालिकेची असून या जागेवर परस्पर बांधकाम करुन या गाळ्यांची विक्री करण्यात आली होती.

दरम्यान, पालिकेने या गाळ्यांच्या शटरवर नोटीस चिपकवून संबंधीत अनोळखी निणावी गाळेधारकांना सात दिवसांच्या आत गाळ्यांचा मालकी हक्क सिध्द करावा अन्यथा हे अनधिकृत बांधकाम स्वता: तोडावे अन्यथा पालिका प्रशासनाकडून हे बांधकाम तोडून संबधीत खर्च वसूल केला जाईल, अशी नोटीस बजावण्यात आल्याने सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईत मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, उपमुख्याधिकारी महेंद्र कातोरे, कर अधीक्षक रामदास म्हस्के, प्रभारी आरेाग्य अधिकारी प्रदीप पवार, वसंत राठोड, गोपाळ पाली, अनिल भाकरे, राजेंद्र चौधरी, जय पिंजाणी आदी उपस्थित होतेे.

Leave A Reply

Your email address will not be published.