वॉटर पार्कमध्ये बुडून वारल्याचा नातेवाईकांचा आरोप : वाटर पार्क ने आरोप फेटाळला : शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष
भुसावळ | प्रतिनिधी
शहरातील अलिशान वॉटर पार्कमध्ये एकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार दिनांक १७ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या तरुणास येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत्य घोषीत केले. वॉटर पार्क मधील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे मात्र या आरोपाला वॉटर पार्क व्यवस्थापनाने नकार दिला आहे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताच्या शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमके कारण समजणार असल्याने या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
उर्वरित उद्याच्या अंकात….