भाजप-शिवसेनेच्या आमदारांची सभागृहात चक्क हाणामारी

0

नागपूर: नागपूरात हिवाळी अधिवेशनाचा दूसरा दिवस सुरु असून या अधिवेशनामध्ये आज शिवसेना आणि भाजपाच्या आमदारांमध्ये सभागृहात चक्क हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. आमदारांमध्येच हाणामारी झाल्याने सभागृहात मोठा गोंदळ उडला आहे. यानंतर काही वेळ वादळी चर्चा रंगल्यानंतर सभागृहाचं कामकाज बंद करण्यात आले होते.

भाजपने पहिल्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन सभागृहाचं कामकाज बंद पाडल्यानंतर, आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात, शेतकऱ्यांच्या मदतीवरुन आक्रमक पवित्र्याने केली. भाजपने सामनातील बातमी दाखवत शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याची मागणी केली.दरम्यान, आजच्या दिवसाच्या सुरवातीलाच सभागृहातही भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले. दोन्ही पक्षाचे आमदार इतके आक्रमक झाले की दोन आमदारांमध्ये चक्क हाणामारी झाली.

बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि भाजापचे औसा मतदारसंघातील आमदार अभिमन्यू पवार यांच्या मारामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ही हाणामारी सोडवण्यासाठी भाजप आमदार आशिष शेलार, गिरीश महाजनांनी मध्यस्ती केली. याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही धावत जाऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. सभागृहात शिवसेना भाजप आमदार आमनेसामने आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, रवींद्र वायकर समजूत घालण्यासाठी आले.भाजपाने आज सभागृहात शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यत कामकाज स्थगित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.