भडगावात मोफत विधी कायदे विषयक शिबीर संपन्न

0

भडगाव | प्रतिनिधी

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत विधी सेवा समिती भडगाव व भडगाव तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ग्रामीण रुग्णालय भडगांव येथे मोफत विधी सहाय्य व मानसिक आरोग्य व मनोरुग्ण तसेच मनोविकलांग संबंधीचे कायदे विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबीराचे व्यासपीठावर भडगाव न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीमती रीना खराटे व सह न्यायाधीश ईश्वर ठाकरे, भडगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब आहिरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी श्री. साहेबराव अहिरे, भडगांव डॉक्टरर्स  संघाचे अध्यक्ष डॉ. निलेश पाटील, मानोसपचारतज्ञ डॉ. निमसे उपस्थीत होते.  सदर कार्यक्रमात  ॲङ सुवर्णा मराठे यांनी वैद्यकिय संरक्षण कायदा बाबत व ॲड. हेमंत कुलकर्णी यांनी मानसिक आरोग्य अधिनियामातील तरतुदीसंबंधी अनमोल मार्गदर्शन केले. तसेच ॲङ निमसे व ॲङ निलेश पाटील यांनी मानसिक आरोग्याशी संबंधी महत्वाचे मार्गदर्शन केले. तसेच न्यायाधीश श्रीमती रिना खराटे मॅडम यांनी अध्यक्षीय भाषणात मानसिक आजारी असलेल्या लोकांना सुध्दा मुलभुत अधिकार असुन त्यांचे हक्कांचे संरक्षण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन ॲड. निलेश तिवारी केले  व आभार प्रदर्शन वैद्यकिय अधिकारी साहेबराव अहिरे यांनी केले.  तसेच  सदर कार्यक्रमास ॲड. के.टी. पाटील, ॲङ पी. बी. तिवारी, ॲड. एम बी पाटील, ॲङ आर.के.वाणी, ॲङ विनोद महाजन, ॲड. बी.आर.पाटील, ॲड. के.ए.पवार, ॲङ मानसिंग परदेशी,  ॲड. विजय  महाजन, ॲङ पकाश सोनवणे, ॲड.आसीफ शेख तसेच भडगांव न्यायालयाच्या लाहोरीया मॅडम, बारी भाऊसाहेब, ठाकूर भाऊसाहेब, नितीन पाटील, शिपाई वाडीले, पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी श्री. माळी, भडगांव शहारातील नामांकित डॉक्टर्स, विधी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थी व जेष्ठ नागरीक जनकल्याण संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालय भडगांवचे ऑफिस स्टॉफ व न्यायालीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.