बोदवड येथील रांका विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न

0

बोदवड  – येथील न.ह.रांका हायस्कूलची नुकतीच शैक्षणिक सहल संपन्न झाली.सदर सहल दरम्यान निळकंठ धाम,कुबेर भंडार स्टॅच्यू ऑफ युनिटी,सरदार सरोवर प्रकल्प,आदि स्थळांना दोन दिवस व दोन रात्र या कालावधी दरम्यान भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सामाजिक,धार्मिक, भौगोलिक माहिती गोळा केली.

जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी, भारतात सर्वात जास्त पाण्याची साठवण क्षमता असलेले सरदार सरोवर प्रकल्प, कुबेर भंडार भारतातील कुबेराचे एकमेव मंदिर, इ. वैशिष्ट्य पुर्ण स्थळांना या शैक्षणिक सहली दरम्यान भेटी देण्यात आल्या.

सदर सहल दरम्यान विद्यार्थ्यां सोबत उपशिक्षक श्री. वाय. टी. माळी, एस. के. राणे, ए. एस. कोल्हे, आर. एम. उघडे, आर.एस. आग्रवाल, डी. एम. पाटील, यांसह मनिषा मांडळकर मॅडम, व्ही.आर. पाटिल मॅडम, एस. पी. जाखेटे मॅडम आदिंनी व्यवस्थापन तसेच सहलीचे नियोजन पाहिले.सहलीसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.जे. बडगुजर, उपमुख्याध्यापक एन. ए. पाटील पर्यवेक्षक आर. आर. सोनवणे, व्ही. बी. सोनवणे आदींचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.