पोलीस निरीक्षक परदेशीला श्री छत्रपतीच्या तलवारीची झाली अ‍ॅलर्जी

0

तालुक्यात समाजात शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी

यावल :- शहरात शनिवार दि.२३ मार्च रोजी शिवसेनेतर्फे शिवजयंती सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करण्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. परंतु श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना सजीव देखाव्यात शिवरायांच्या हातात तलवार देऊ नका अशी सूचना ऐन वेळेस पोलीस निरीक्षक डि.के. परदेशी यांनी उत्सव समिती तथा शिवसैनिकांना दिल्याने आणि शिवसेनेला शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेल्या तरुणाच्या हातात तलवार न देता भव्य मिरवणूक काढावी लागली. त्यामुळे तालुक्यात समाजात शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असून लोकसभा निवडणुकीत पोलीस निरीक्षक समाजात दबाव तंत्राचा वापर करीत असल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करून कार्यवाही करावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

शहरातील सातोद रोडवरील शनीमंदिरात पोलीस निरीक्षक डि.के. परदेशी व निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांच्या हस्ते शिव पूजन करून शिवजयंती मिरवणूक सुरू करण्यात आली छत्रपती शिवराय व सोबत दोन मावळे असा सजीव देखावा करण्यात आला होता. परन्तु त्यात शिवाजी महाराजांच्या हातात तलवार देण्यास पोलीस निरीक्षक परदेशी यांनी मनाई केली याबद्दल शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलिसांचा निषेध करून मिरवणूक काढली शिवसेनेच्या नगराध्यक्षा सुरेखा कोळी, नगरसेवक तथा शिवसेना माजी नगराध्यक्ष दीपक बेहेडे, डॉक्टर कुंदन फेगडे, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना उर्फ तुषार पाटील, तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे, भूषण नगरे,हाजी शब्बीरखान शेठ, रज्जाक पटेल, किशोर कुलकर्णी, गोपाल सिंह पाटील, वसंतराव भोसले, जगदीश कवडीवाले, शरद कोळी, पप्पू जोशी, संतोष खर्चे, भुरा शाह यांची उपस्थिती होती उत्सव समिती अध्यक्ष हुसेन तडवी उपाध्यक्ष प्रवीण बडगुजर, आकाश कोळी, अजहर खाटीक, सागर बोरसे, योगेश पाटील, मोहसीन खान, सचीन कोळी यांनी मिरवणुकी साठी परिश्रम घेतले.

पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी ये काही वेळेस तक्रारी नसतानासुद्धा समोरच्या मुलांवर गुन्हे दाखल करीत आहे असेच एक प्रकरण नुकतेच साखळी गावात घडले मुलाच्या घरात जुनी गंजलेली तलवार असल्याचे निमित्त साधून आणि कोणाचीही तक्रार नसताना त्या मुलाच्या विरोधात स्वतः पोलीस फिर्यादी होऊन गुन्हा नोंद करण्यात आला तर काही वेळेस गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले असतानासुद्धा जनतेची मागणी असतांनासुद्धा आणि पोलीस फिर्यादी न होता गुन्ह्यांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. ट्रक चालका वरील दरोडा प्रकरणात आरोपी निष्पन्न झालेले असताना हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत का केला गेला नाही, तो गुन्हा सुद्धा खोटा गुन्हा दाखल झाला आहे का? यावल शहरात एका गर्भवती अविवाहित तरुणीची हत्या प्रकरण सुद्धा पोलिसांनी दडपून टाकले होते व् आहे. गो वाहतुक/ गुराची वाहतूक प्रकरण नुकतेच घडले त्यातील अवैध गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांच्या समक्ष कुठे व का फरार झाले व ज्यांनी वाहन पकडले त्यांच्यावरच गुन्हा दाखल का करण्यात आला ? इत्यादी अनेक प्रकरणांमुळे यावल पोलिस स्टेशन हद्दीत जनमानसात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून यावल पोलीस स्टेशनमध्ये निपक्षपाती कारवाई कशी होईल याबाबत त्वरित कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.