पोलीस कर्मचाऱ्याला दुचाकीची धडक; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील खोटे नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर भरधाव दुचाकीच्या धडकेत पोलीस कर्मचारी व त्यांचा मुलगा जखमी झाले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुलाब नामदेव माळी (वय ४३, रा. श्री रेसिडन्सी अपार्टमेंट, वाटीका श्रम जळगाव) हे जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून नोकरीला आहे. रविवारी २ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता  गुलाब माळी हे मुलगा पियुष माळी यांच्या सोबत दुचाकी (एमएच १९ डीके ९५२५) ने राष्ट्रीय महामार्गावरून घरी जात होते.

त्यावेळी मागुन अज्ञात दुचाकीने भरधाव वेगाने येवून जोरदार धडक दिली. या अपघातात गुलाब माळी आणि त्यांचा मुलगा पियुष माळी हे जखमी झाले. अपघात घडल्यानंतर अज्ञात दुचाकीधारक घटनास्थळाहून पसार झाला. दोघांनी खासगी रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ४ जानेवारी रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.