पाचोरा येथे गट साधन केंद्रात कायदेविषयक शिबीर उत्साहात संपन्न

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांचे आदेशानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त “पॅन इंडिया अवेरनेस अँड आऊटरिच प्रोग्राम” या ४४ दिवसांचा कार्यक्रमाचे दि. २ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने दि. २५ रोजी  तालुका विधी सेवा समिती व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने  गट साधन केंद्र, पाचोरा येथे  कायदे विषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महिलांचे अधिकार, शोषण, हक्क, या कायदेविषयक दिल्या जाणाऱ्या सेवा हा होता.

याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी हे अध्यक्ष स्थानी होते. शिबिराच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांचे अॅड. भाग्यश्री महाजन यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील यांनी केले. त्यानंतर विधी शाखेची विद्यार्थ्यांनी कु. चंचल पाटील, कु. भाग्यश्री महालपुरे, अॅड. मीना सोनवणे यांनी महिलांचे अधिकार व हक्क याविषयी सांगितले. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना दिवाणी न्यायाधीश एफ. के‌.  सिद्दीकी यांनी  प्रदूषण विषयी बोलतांना मोफत पाणी आणि हवा यावर मार्गदर्शन केले.

यावेळी मंचावर अॅड. एस. पी. पाटील, अॅड. डी. आर. पाटील, अॅड. एस. बी. माहेश्वरी, अॅड. अरुण भोई, अॅड. गोपाळ पाटील उपस्थित होते. यावेळी अॅड. एल. एस. परदेशी, अॅड. पी. एस. नागणे, अॅड. कविता मासरे, अॅड. कल्पना खेडकर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितीतांचे आभार अॅड. मनिषा पवार यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  तालुका  विधी सेवा समितीचे दिपक तायडे, ईश्वर पाटील,  तसेच विधी शाखेचे विद्यार्थी सौरभ विसपुते, प्रवीण माळी, वृषभ पाटील, हरिशचंद्र तावडे, अनम शेख, तालुका वकील संघ, अंगणवाडी सेविका आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.