नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक रद्द करावे,भुसावळ मुस्लिम मंच

0

भुसावळ (प्रतिनिधी)- बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायद्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याने मुस्लिम धर्मियांवर अन्यायाची आगळीक होत असल्याचे वाटत आहे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बाबत भुसावळ मुस्लिम मंच चे सभासद व शहरातील जागरुक मुस्लिम नागरीक यांच्या वतीने  सोमवार 16 रोजी दुपारी तहसिलदार दिपक ढीवरे यांना निवेदन देण्यात आले आहे.

यापूर्वीही कलम ३७० रद्द केले, तोंडी तीन तलाकला सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.यामुळे मुस्लिम बांधवांना तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जात आहे. सदर कायद्यांना समाजाचा तीव्र विरोध असुन कारण त्‍यात स्पष्टपणे मुस्लिम विरोध असल्याचे दिसत आहे.मुस्लिम बांधवांवर सतत अन्याय होत आहे.भारतीय संविधान विरोधी सदरील कायदे असुन त्यात धर्माच्या नावाचा उच्चारण करून भेदभाव केला गेला आहे. प्रत्यक्षात सदरील कायद्याचे सादरीकरण हे कायदेशीर नव्हते व त्यामुळे सदरील कायदा पास झाला तरी तो संविधानाच्या तरतुदीप्रमाणे नाही म्हणून सदरील कायदे त्वरित रद्द करण्यात यावे त्यामुळे एकाच धर्माच्या लोकांवर हा अन्याय कारक होणार आहे तसेच इतर धर्माच्या लोकांना नागरिकत्वाची सूट दिल्याने भारत देशात लोकसंख्येचा स्फोट होण्याची दाट शक्यता आहे.बेरोजगारी व गुन्हेगारी वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. सदर घटनाबाह्य कायदे त्वरित रद्द करण्यात यावे व सामाजिक समतोल नियंत्रणात ठेवावा अशा मागण्‍या भुसावळ मुस्लिम मंच तर्फे करण्यात आल्‍या आहे.या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष हाजी शेख शफी शेख अजीज,हाजी आशीक खान शेरखान,नगरसेवक हाजी सलीम पिंजारी,हाजी साबीर शेख,शेख इम्‍तियाज,सिकंदर खान,रहीम कुरेशी,युसूफ खान,सलीम गवली,मौलाना अब्दुल हकीम खान,मौलाना कमरूद्दिन,हाजी गुलाम सरवर,हाजी नूरआलम, अशफाक हाफीज गुलाम पिंजारी  ,मौलाना अब्दुल हकीम खान, मौलाना कमरुद्दीन , यूसुफ खान मो खान , बागवान युवा फाउंडेशन अध्यक्ष साजिद सलीम बागवान , डॉ इमरान रउफ खान,

असंख्य कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.