टेम्पोची दुचाकीला धडक ; दाम्पत्यासह एकाचा मृत्यू

0

जळगाव । शहरातील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या समोर आज पहाटे ट्रीपल सीट दुचाकीला मागून येणाऱ्या मालवाहू टेम्पोने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य  जागीच ठार झाले तर तीसऱ्याचा व्यक्तीचाही उपचारदरम्यान मृत्यू झाला.  श्यामलाल शहादूलाल केवट (वय-४०, रा. कैथा ता. अमिलिहा, रिवा , मध्यप्रदेश ह.मु. सिंधी कॉलनी) पत्नी नेवस्वा श्यामलाल केवट (वय-३८) असे घटनेत मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, श्यामलाल केवट हे आपल्या पत्नीसह दोन मुली व मुलगासह राहतात. श्यामलाल हे शहरातील महेंद्र मकरेजा यांच्या जीत बेकरी मध्ये गेल्या १५ वर्षांपासून काम करतात. तर पत्नी नेवस्वा केवट ह्या भाजीपाला विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. श्यामलाल यांचे भाऊ दिपक साधुलाल केवट हे देखील भाजीपाला विक्री करण्याचे काम करतात. भाजीपाला विक्री करण्यासाठी दररोज ते शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत जातात. नेहमीप्रमाणे आज सकाळी ४.३० वाजता श्यामलाल केवट हे पत्नी नेवस्वा आणि भाऊ दिपक सोबत दुचाकी क्रमांक (एमएच १९ एडब्ल्यू ७९६२) ने भाजीपाला घेण्यासाठी निघाले.

शहरातून औद्योगीक वसाहतीच्या दिशेने जात असतांना पलीकडून येणाऱ्या छोटा हत्ती या वाहनाने धडक दिली. याचवेळी छोटा हत्ती वाहनाच्या पाठीमागे टाटा मॅजीक हे वाहन येत होते. पुढील छोटा हत्ती या वाहनाचे अचानक ब्रेक लागल्याने मागील टाटा मॅजीक हे वाहन त्यावर आदळले. या अपघातात दुचाकीचालक श्यामलाल केवट व त्याच्या मागे डबलसीट बसलेली त्यांची पत्नी नेवस्वा केवट हे दोघे जागीच ठार झाले. तर भाऊ दिपक केवट हे गंभीर जखमी झाले. दिपक यांना तातडीन डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता सकाळी ९ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.