जिल्ह्यात आज १३० नवीन रुग्ण आढळले ; २१५ बरे झाले

0

जळगाव : जळगाव जिल्ह्यात महिनाभरापासून कोरोना संसर्गाच्या आकड्यांनी दिलासा दिला आहे. नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या सातत्याने कमी होत असून, बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मंगळवारी प्राप्त अहवालात १३० नवीन रुग्ण आढळून आले आहे. तर २१५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे.

जिल्ह्यातील  एकूण रुग्णसंख्या ५२ हजार ४१ झाली आहे, तर बरे झालेल्यांचा आकडा ४९ हजारांच्या टप्प्यात आहे. गेल्या २४ तासांत दोन रुग्णांचा बळी गेला. त्यामुळे जिल्ह्यात १२४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी ९४.२१ टक्के रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आले.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर २९, जळगाव ग्रामीण १०, भुसावळ १३, अमळनेर ४, चोपडा ४, पाचोरा १, भडगाव १, यावल ३, एरंडोल ००, जामनेर ४८, चाळीसगाव ०५, मुक्ताईनगर ०१ बोदवड ०२, रावेर ०६ असे एकूण १३० रुग्ण आढळून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.