जिल्हा बँक निवडणूकी संदर्भात ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन

0

अमळनेर, प्रतिनिधी – जिल्हा बँकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भात सभासदांचे ठराव पाठविण्यासाठी कर्जमाफी मुळे अडचणी येत असून यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदन दिले आहे.

मागील शासनाच्या कर्जमाफी योजनेमुळे २०१७ पासून शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे संस्था बँक स्थरावर थकीत झाल्या आहेत. सहकार घटना दुरुस्ती ९७ नुसार जिल्हा बँकेच्या २०२० सार्वत्रिक निवडणुकीत संस्थाचे प्रतिनिधी ठराव मागवतांना थकीत संस्थचे पंच कमिटी ऐवजी इतर सभासदांमधून ठराव करण्याची अट असल्याने पंच कमिटी ठरावाच्या अधिकारापासून वंचित राहतील. नवीन शासनाच्या कर्जमाफी धोरणानुसार मार्च २०२० पर्यंत कर्जमाफी झाल्यावर थकीत संस्था बँकस्तरावर नियमित होतील त्यानंतर ठराव मागितल्यास पंचकमिटीस ठरावाचा अधिकार मिळेल त्यामुळे ही प्रकिया मार्च २०२० नंतर राबवावी अशी विनंती कृषी उत्पन्न बाजार समितीचे महेश देशमुख, संचालक सुरेश पिरन पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ आबा पाटील, माजी प्रेसिडेंट शेतकी संघ संजय पाटील, गौरव पाटील, हिंमत पाटील, कुंदन निकम आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.