जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला

0

जळगाव । प्रतिनिधी 

शहराचा पाणीपुरवठा तांत्रिक कारणामुळे  एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.  30 जुलै आणि 1 ऑगस्ट ला होणारा पाणी पुरवठा 1 सप्टेंबर आणि 2 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जळगांव शहर महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरास पाणी पुरवठा करणेचे कामी पाणी पुरवठा योजने अंतर्गत वाघुर 33 के.व्ही. उच्चदाब वाहीनीवरील केबल मध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने वाघुर पंपींग स्टेशनला होणारा विज पुरवठा 30 जुलै रोजी सकाळी 2.00 वाजेपासून खंडीत झाला असून वीज कंपनीतर्फे काम सुरु असल्याकारणाने जळगांव शहराचा पाणी पुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत असुन दि.30 जुलै रोजीचा पाणी पुरवठा 31 जुलै ला करण्यात येणार आहे. तर 31 जुलै व 1 सप्टेंबर रोजीचा होणारा पाणी पुरवठा 01 व 02 सप्टेंबर रोजी करण्यात येईल. अशी माहीती महापालिका प्रशासनाने दिली आहे. नागरीकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे देखील आवाहन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.