जनता कर्फ्यू जाहीर होताच तेलाच्या किंमती भडकल्या

0

जळगाव |  जळगाव शहरात ११ मार्चपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यूचे अादेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी काढले. हे अादेश निघत नाहीत ताेच ब्रॅडेड तेल कंपन्यांनी दरात केलेली दरवाढ बाजारपेठेत धडकली. शेंगदाण्याचे दर तेच असले तरी अधिक मागणी असलेल्या साेयाबीन तेलाच्या दरात प्रतिकिलाे चार रुपये तर सनफ्लाॅवर तेलाच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली.

गेल्या वर्षी काेराेनामुळे करण्यात अालेल्या लाॅकडाऊनच्या काळात तेलाच्या दरात माेठी वाढ झाली हाेती. ती दिवाळीपर्यंत कायम राहिली हाेती. मात्र, दिवाळीपासून (नाेव्हेंबर) जानेवारी महिन्यांपर्यंत तेलाचे दर काही अंशी का असेना पण स्थिर हाेते. त्यात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात दखलपात्र अशी वाढ झाली.

साेयाबीन तेलाचे दर प्रति १५ किलाेचे २४५० रुपये हाेते. अर्थात, साेयाबिन तेलाचा हाच डबा १८०० वरुन २०६० झाले हाेते. तर सूर्यफुलाचे तेल २१०० रुपयांवरुन २५०० रुपयांवर गेले हाेते. हे दर ८ मार्चपर्यंत कायम हाेते. गेल्या पंधरवड्यात वाढलेले दर मंगळवारी अचनाक संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी जनता कर्फ्यू जाहिर करताच विविध ब्रॅण्डेड कंपन्यांनी नवे दरपत्रक घाऊक व्यापाऱ्यांना पाठवून दरवाढ जाहीर केली. साेयाबीन तेलाचा १५ किलाेचा डबा २०६० रुपयांवरुन २१२० रुपयांवर झाला. तर सूर्यफुलाचा १५ किलाेचा डबा २५५० रुपयांवरुन २६५० रुपये झाला असल्याचे घाऊक व्यापारी पीयुष बियाणी यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.