घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्या व बोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील गोपाळपुरा येथे घराजवळ बांधलेल्या दोन शेळ्या व एक बोकड असे १६ हजार ५०० रुपयांचे पशुधन चोरट्यांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोपाळपूरा येथील भोलेनाथ मंदिर पुलाजवळ गं.भा. शीला नागराज सपकाळे (वय ४०) ह्या वास्तव्यास आहेत. मोलकरीण म्हणुन काम करून त्या उदरनिर्वाह करतात. १९ डिसेंबर रोजी रात्री शीला सपकाळे यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे असलेल्या शेळ्या व बोकड घराजवळ बांधले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास शीला सपकाळे यांना जाग आल्यावर बांधलेल्या शेळ्या व बोकड जागेवर दिसून आले नाही.

सर्वत्र शोधाशोध करूनही शेळ्या व बोकड मिळून न आल्याने त्यांनी याबाबत गुरुवार २३ डिसेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सहायक फौजदार मनोज इंद्रेकर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.