घरगूती गणेशोत्सव लोक आरास स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

0

• नाशिक येथील माधवदास महाराज राठी यांच्या उपस्थितीत होणार भव्य दिव्य अनोखा सोहळा

• वेद पाठशाळेचे साखरे गुरुजी शांती पाठ सह करणार शास्त्रोक्त पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष एक आवर्तन

• सचिन नारळे, हेमलता बामणोदकर यांची प्रमुख उपस्थिती

• कविता ठाकरे करणार संचलन

• आशा फाउंडेशनचे माजी संचालक गिरीश कुलकर्णी यांनी केले परीक्षण

जळगाव- लोकशाही, लोक लाईव्ह च्या वतीने घेण्यात आलेल्या घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेबाबतची शिगेला पोहचलेली उत्सुकता आता संपणार असून २८ नोव्हेंबर रविवारी रोजी दुपारी साडेचार वाजता या अभूतपूर्व स्पर्धेचा निकाल घोषित होणार आहे.

नाशिक येथील माधवदास महाराज राठी हे या अनोख्या आणि भव्यदिव्य ऐतिहासिक अशा पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित राहणार असून या निमित्ताने साऱ्या महाराष्ट्राला लोक लाईव्हच्या माध्यमातून आशिर्वचन देणार आहेत.

शांती पाठ सह शास्त्रोक्त पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष

महाराष्ट्रातील प्रसिद्ध जळगाव येथील वेद पाठशाळेचे संस्थापक साखरे गुरुजी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. शांती पाठ सह शास्त्रोक्त पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष एक आवर्तन साखरे गुरुजी सादर करतील. त्याच वेळी सर्व गणेश भक्तांनी आपापल्या घरी अथर्वशीर्षचे आवर्तन करून सामूहिक आवर्तनात सहभाग घेऊन गणेश आराधना करावी, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

गणेश वंदना

प्रभाकर कला संगित अकादमीच्या डाॅ. अपर्णा भट कासार यांची शिष्या कु. मृण्मयी कुळकर्णी गणेश वंदना सादर करणार आहे.

प्रमुख अतिथी

या कार्यक्रमास नाशिक येथील माधवदास महाराज राठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राठी महाराजांनी वयाच्या ५ व्या वर्षापासून प्रवचन आणि १२ व्या वर्षी कीर्तनास प्रारंभ केला. वै. धुंडामहाराज देगलूरकर परिवारातून अनुग्रहित, श्रीगुरु वै. भानुदासमहाराज देगलूरकर यांचा अनुग्रह, विश्व हिंदू परिषद नाशिक जिल्हाकार्याध्यक्ष म्हणून १७ वर्ष जबाबदारी, धर्मचार्य संपर्क प्रमुख म्हणून १५ वर्ष दायित्व, सध्या प्रांत धर्माचार्य मंडळ सदस्य व केंद्रात समन्वय विचारमंच प्रमुख, संस्कार संवर्धिनी सभा अखिल भारतीय सचिव धर्मसभा नाशिक विश्वस्त सदस्य आहेत. तसेच गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, साईकृपा बेंटेक्स ज्वेलरीच्या संचालिका हेमलता बामणोदकर, लोकशाही समूहाच्या मुख्य संपादक शांता ताई वाणी आणि सल्लागार संपादक धो. ज. गुरव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

लोकशाही समूहाद्वारे थेट लाईव्ह प्रक्षेपण

हा संपूर्ण कार्यक्रम लोकशाही समूहाच्या यु ट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम तसेच सर्व सोशल मिडीयाद्वारे लाईव्हरित्या सर्वांना पाहता येणार आहे.

स्पर्धेत सहभागी सर्वांच्या घरातील गणपती समोर केलेल्या आरासचा व्हिडिओ लोकलाईव्ह चॅनल वर प्रसारित करण्यात आले आहे. या अनोख्या स्पर्धेत महाराष्ट्र आणि परदेशातील मराठी कुटुंबातील गणेश मूर्तीचे आणि आरास चे दर्शन गणेश भक्तांनी घेतले.

प्रथमच अशी भव्य अभूतपूर्व स्पर्धा झाली. लोकलाईव्ह चॅनल वर हे सर्व व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहे. सर्व गणेशभक्तांना लोक लाईव्हच्या चॅनलला भेट देऊन सर्व गणपती बाप्पाचे दर्शन नेहमीसाठी घेता येणार आहे.

यांनी केले परीक्षण

आशा फाउंडेशनचे माजी संचालक गिरीश कुलकर्णी यांनी परीक्षण केले. प्रत्येक व्हिडीओचे व्ह्यु आणि लाईक्सचे देखील गुणांकन केले गेले आहे.

स्पर्धेत विजेत्या आरासला पहिले बक्षीस कांजीवरम साडी, दुसरे बक्षीस पैठणी, तर तिसरे बक्षीस डायमंड नेकलेस आणि उत्तेजनार्थ लक्ष्मीहार असे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

तर लोकप्रिय आरास म्हणजे सर्वात जास्त व्ह्यु आणि लाईक्स आणि कॉमेंट्सचे गुणांकन करून पहिले आणि दुसरे बक्षीस पैठणी, तिसरे बक्षीस लक्ष्मीहार असे पारितोषिक देऊन २८ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी साडेचार वाजता ऑनलाइन पद्धतीने सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी सर्वांनाच ईप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

तरी स्पर्धेत सहभागी झालेल्या सगळ्यांनी आणि सर्व गणेश भक्तांनी लोकशाही समूहाच्या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित राहून या अभूतपूर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी विनंती लोकशाही समूहाच्या वतीने  करण्यात आली आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक-

यू ट्यूब – https://youtube.com/playlist?list=PLyhiLpPbCtS3tDrNqyx979HcvMQ5MySUf

फेसबूक – https://www.facebook.com/lokshahilive/

वेबसाईट – https://lokshahilive.com/

Leave A Reply

Your email address will not be published.