ग्राहकांना झटका ! कपड्यांसह आता चप्पल-सँडल महागणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीच्या नियमात मोठे बदल होणार आहेत. या बदलामुळे नवीन वर्ष तुमच्यासाठी महागडं ठरणार आहे. या बदलांमध्ये प्रामुख्याने ई-कॉमर्स ऑपरेटर्सवर पॅसेंजर ट्रान्सपोर्ट किंवा रेस्टॉरंट सर्व्हिसेसच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेवांवर टॅक्स समाविष्ट आहे.

त्याचप्रमाणे चप्पल आणि कपड्याच्या सेक्टरमध्ये इनव्हर्टेड ड्यूटी स्ट्रक्चरमध्ये सुधारणा देखील नवीन वर्षातच होणार आहे. या सुधारणेनंतर फूटवेअरवर 12 टक्क्यांच्या जीएसटी आकारण्यात येईल. फूटवेअरवर 12 टक्के टॅक्स आकारला जाईल याचा अर्थ असा की, या वर्षात जर तुम्ही चप्पल 100 रुपयांना खरेदी करत असाल तर तुम्हाला 2022 मध्ये त्याकरता 112 रुपये मोजावे लागतील.

सध्या फूटवेअरवर 5 टक्के जीएसटी आहे. तर टेक्सटाइल उत्पादन रेडिमेड कपड्यांसह सर्व प्रकारच्या कपड्यांच्या प्रोडक्ट्सवर (कॉटन वगळता) 12 टक्के जीएसटी आकारणे सुरू होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.