खादिमे मिल्लत पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0

फैजपूर, ता.यावल, वार्ताहर – येथील खिदमते मिल्लत फाउंडेशनतर्फे दर वर्षी दिला जाणारा खादिमे मिल्लत पुरस्कार वितरण सोहळा यंदा थाटात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी आ.शिरीष चौधरी होते. करीम सालार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डाॅ.शोएब मोहम्मद खान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

शरीफ अहमद अंसारी यांच्या कुराण पठणाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर यांनी प्रस्तावित केले. यावेळी आ.शिरीष चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आजच्या काळात चांगल्या कामाला चांगलं म्हणं मोठ्या ह्रदयाचे काम आहे. खिदमते मिल्लत फाउंडेशनचे कार्य हे प्रत्येक युवकांसाठी प्रेरणादायी आहे. चांगल्या लोकांचा नेहमी सन्मान व आदर केला पाहिजे. करीम सालार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, खिदमते मिल्लत फाउंडेशनचे युवक जे कार्य करत आहेत ते खुप चांगले आहे. मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाचे शोएब मोहम्मद खान व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे  यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

पुरस्कारार्थी मध्ये खादिमे मिल्लत पुरस्कारांची विभागणी करण्यात आली. यात, धार्मिक श्रेत्र – कारी बदिऊज्ज़मा, मुफ्ती अरशद अली शौकत अली, हाफीज़ हमिदउद्दीन फलाही, शैक्षणिक क्षेत्र – आर.क्यु.शेख, इस्माइल खां तुकडु खां तडवी, समाजिक क्षेत्र – शेख इकबाल हुसैन शेख हसन, अमिनुद्दीन शेख युसुफ, आरोग्य क्षेत्र – डॉ. मुदस्सर नजर शेख अ.नबी, डॉ.तनवीर अहमद शेख निसार, डॉ.इमरान अखतर शेख अ रऊफ, राजनीतिक क्षेत्र – शहेनाजबी शेख युसुफ, नफीसाबी शेख ईरफान, साहित्य क्षेत्र – सलीम खान इस्माइल खान, वसीम अकील शाह, शायरी क्षेत्र – मरहुम रफीक आदिल,  रईस फैज़पुरी, पत्रकारिता क्षेत्र – समीर तडवी, शेख कामील अ रहमान, जिवन गौरव पुरस्कार – मरहुम आर एम शेख, अब्दुल करीम सालार, अब्दुल्लाहशेख रसूल, हयात खान वाहेद खान,

सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, डाॅ.अ जलील, उपनगराध्यक्ष रशिद तडवी, शेख जफर, कलिम खान गटनेते काँग्रेस, शेख कुरबान राष्ट्रवादी कॉंग्रेस गटनेते, अब्दुल जलील, रहीम सर, शेख रियाज, आसीफ मॅकेनिक, इरफान मेंबर, सै असगर सावदा, इरफान सेठ चिनावल, शेख शकील कर्जोद, डाॅ.दानिश, सलीम उस्मान, केतन कीरंगे, वसीम जनाब, अहमद भाई यांची उपस्थिती होती. सुत्रसंचालन हारुन उस्मानी यांनी केले. खिदमते मिल्लत फाउंडेशनचे अध्यक्ष मुदस्सर नजर, फारुक जनाब, इमरान खान, कामील खान, शेख शफीक, शेख अखतर यांनी परिश्रम घेतले तर इमरान खान यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.