कांदा अनुदान वाटपसाठी मुदतवाढ

0

जळगांव.दि.17 –
राज्य शासनाने कांदा अनुदान वाटपासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे जिल्हा परिसरातील अनेक तालुक्यातील गावांमधे शेतकर्यांना ऑनलाईन 7/12 मिळविण्यासाठी दिवसच्या दिवस खर्ची घालावे लागतआहे. वेळ प्रसंगी दोन तीन फेर्यासुद्धा माराव्या लागत आहे.
कांदा अनुदानास पात्र असणार्या शेतकर्यांना राज्य शासनाने नुकतीच मुदतवाढ दिली आहे. तसेच ऑनलाईन संगणीकृत सातबारा उतारा ओटीपीसाठी सवलत देण्यात आली आहे. तालुका तसेच सजा भागातील तलाठी कार्यालयात बहुतांश ठिकाणी संगणक व प्रिंटर नसल्यामुळे गावांपासून 25 ते 30 किलोमीटरपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तासनतास रागेत उभे राहून सात बारा काढावा लागत असल्याने शेतकर्यांना त्रास सहन करावा लागतो. त्यात सर्व्हर डाऊन झाले तर दिवस दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या कांदा विक्री अनुदानासाठी मुदतवाढ देण्यात आल्यामुळे बाजार समितीत लागत आहे. सद्यस्थितीत शेतीमशागत, उन्हाळी ज्वारी,बाजरीसह गहु काढणी आदी कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतीची कामे बंद करून सात बारा काढण्यासाठी तासन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. शासनाने कांदा अनुदानाची मुदत सलग तीन महिन्यापासून वाढतच असून ती आता 28 फेब्रुवारीपर्यंत केली होती. मात्र शेवटपर्यंत प्रशासन शेतकर्यांना सातबारा उतारा सेवा पुरवण्यात अपयशी ठरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.