एरंडोल येथील बँक ऑफ बडोदा शाखेचे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने बँक शाखा बंद

0

एरंडोल (प्रतिनिधी) : एरंडोल येथील बँक ऑफ बडोदा च्या शाखेचे आठ पैकी पाच कर्मचारी कोरोना बाधित आढळून आल्याच्या कारणावरून येथील बँक शाखेचे कामकाज 5 ऑक्टोबर 2020 पासून बंद ठेवण्यात आले आहे.

एरंडोल येथे पूर्वीची देना बँक व आताची बँक ऑफ बडोदा या शाखेत एकूण आठ कर्मचारी असून त्यापैकी पाच कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले व तीन कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बँकेचे दैनंदिन कामकाज पुढील आदेश येईपर्यंत तूर्तास बंद ठेवण्यात आले आहे यासंदर्भात बँकेच्या प्रवेशद्वारावर तसा सूचनेचा फलक सुद्धा लावण्यात आलेला आहे. ही शाखा शहराच्या मध्यवर्ती भागात मारवाडी गल्लीत असून बँकेचे कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे वृत्त समजताच  गावात खळबळ माजली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.