अमरावती हिंसा प्रकरण : भाजपनेते अनिल बोंडे अटकेत

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी हिंदूत्ववादी संघटनांनी बंद पुकारला. मात्र त्याला हिंसक वळण लागलं होतं. आता या प्रकरणी पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. अटक केलेल्यांमध्ये भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांचाही समावेश आहे.

अमरावतीत काही दुकानांना आग लावण्यात आली. सर्वाधिक उपद्रव राजकमल चौक, नमुना परिसरात झाला. रविवारी अमरावतीमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. शिवाय तीन ते चार दिवसांसाठी इंटरनेटसेवा देखील बंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी आतापर्यंत दोन्ही गटातील जवळपास ५० पेक्षा जास्त आंदोलनकर्त्यांना अटक केली आहे.यामध्ये भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडेंसह महापौर चेतन गावंडे आणि भाजपचे सभागृह नेते तुषार भारतीय यांचाही समावेश आहे.

कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही – बोंडे

अमरावतीत मुस्लीमांनी जो हिंसाचार केला, त्याचा शांततापूर्वक निषेध व्यक्त करणाऱ्यांचा आवाज महाविकास आघाडी सरकार दाबत आहे. आज सकाळी ६ वाजता पोलिसांनी माझ्या घराला घेराव घातला. तसंच, कितीही आवाज दाबला तरी हिंदू मार खाणार नाही, असं अनिल बोंडे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.